Breaking News

मशरूम शेतीपासून आरोग्यदायी आहारापर्यंत; सांगोला येथे ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

मशरूम शेतीपासून आरोग्यदायी आहारापर्यंत; सांगोला येथे ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन


सांगोला : सांगोला तालुक्यातील शेतकरी, युवक, महिला, नवउद्योजक तसेच विद्यार्थी आणि संशोधकांना मशरूम शेती, पोषण, आरोग्य आणि व्यवसायाच्या विविध पैलूंची शास्त्रोक्त माहिती मिळावी, 

या उद्देशाने डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांचा वाढदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याच्या निमित्ताने दि. ५ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सायन्स (Allied Health Science) शाखेच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मशरूम शेती व व्यवस्थापन–प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये मशरूम शेती कशी करावी, उत्पादनासाठी आवश्यक साधने व बाबी, कमी जागेत मशरूम उत्पादन घेण्याचे तंत्र, मशरूमच्या विविध प्रजाती, 

शेती व्यवस्थापन तसेच मशरूम व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान मशरूम शेतीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे.

यानंतर दि. ६ व ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘रोजच्या आहारातील आळंबी (मशरूम) सेवनाचे आहारशास्त्रीय तसेच वैद्यकीय लाभ’ या मध्यवर्ती विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

मशरूममधील पोषक घटक, दैनंदिन आहारातील उपयोग, आरोग्यविषयक संभाव्य फायदे, औषधी उपयोग, आहारयोग्य मशरूमच्या विविध जाती, लागवड तंत्रज्ञान तसेच मशरूम उत्पादनाचे आर्थिक महत्त्व या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासकांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले असून, डॉ. श्रीकांत सी. रिटे, 

श्री. मितेशकुमार सी. पाटील, मा. प्रफुल्ल जी. शेडे, डॉ. सिद्धार्थ एम. शीलवंत, मा. दानिश मुंदलोन तसेच सोलापूर विद्यापीठाच्या Allied Health Science विभागाचे संचालक डॉ. अभिजित जगताप यांचा सहभाग राहणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून मशरूम उत्पादनाला ग्रामीण भागातील रोजगार व स्वयंरोजगाराची संधी म्हणून प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे तसेच मशरूमच्या पोषण व आरोग्यविषयक महत्त्वाबाबत जनजागृती करणे, 

हा प्रमुख उद्देश आहे. कमी जागेत मशरूम उत्पादन घेता येत असल्याने शेतकरी, महिला आणि युवकांसाठी हा शेतीपूरक व्यवसाय महत्त्वाचा ठरू शकतो.

मशरूम शेती प्रशिक्षणासाठी नोंदणी शुल्क ३०० रुपये असून त्यामध्ये प्रमाणपत्र, कार्यशाळा किट, भोजन व चहापानाचा समावेश आहे. तर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी नोंदणी शुल्क ५०० रुपये असून त्यामध्ये प्रमाणपत्र, सेमिनार किट, भोजन व चहापानाचा समावेश आहे.

राष्ट्रीय चर्चासत्रासाठी नोंदणीची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर २०२६ असून इच्छुकांनी दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी अधिक माहितीसाठी डॉ. मनोजकुमार माने – ९५६१७८११८८ तसेच डॉ. शुद्धोधन कदम – ९७६६२३४२७३ यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

सदर उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. धसाडे एस. एस. यांच्या संयोजनाखाली करण्यात आले असून डॉ. कदम एस. एन. व डॉ. मनोजकुमार माने हे 

समन्वयक, डॉ. ठोंबरे जे. बी. हे IQAC समन्वयक तर डॉ. ज्योतिबा हुर्दुके हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. संस्थेचे सन्माननीय सचिव विठ्ठलरावजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

ग्रामीण भागातील युवक-युवती, महिला, शेतकरी, विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, मशरूम उत्पादक आणि नवउद्योजकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन

 मशरूम शेती, आरोग्यदायी आहार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments