सांगोला तालुक्यातील आरोग्य सुविधांना मिळणार बळ; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.
कराडवाडी, गौडवाडी, कटफळ आणि बलवडी येथील आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करावा,
अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. तसेच कोळा येथील आरोग्य केंद्रासाठीही आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा त्यांच्या गावाजवळच उपलब्ध व्हाव्यात,
यासाठी आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती व आवश्यक सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी संबंधित प्रश्न आरोग्यमंत्र्यांसमोर ठामपणे मांडला.
आमदारांच्या मागणीची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आवश्यक कार्यवाही करण्याची भूमिका व्यक्त केली.
दरम्यान, तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या प्रश्नांसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे कराडवाडी, गौडवाडी, कटफळ, बलवडी
आणि कोळा परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आरोग्य क्षेत्रातील प्रलंबित कामांना आता गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


0 Comments