Breaking News

सोलापूर जिल्हा कुमार व कुमारी कबड्डी स्पर्धा शुक्रवारपासून सांगोल्यात३ ऑक्टोबर दरम्यान सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे होणार..

सोलापूर जिल्हा कुमार व कुमारी कबड्डी स्पर्धा शुक्रवारपासून सांगोल्यात३ ऑक्टोबर दरम्यान सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे होणार..


सोलापूर - शिवछत्रपती कबड्डी संघ कडलास आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५३व्या जिल्हा कुमार-कुमारी निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा २ व ३ ऑक्टोबर दरम्यान सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे होईल.

या स्पर्धेतून ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पालघर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा कुमार व ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या कुमारी स्पर्धांसाठी जिल्हा संघ निवडण्यात येतील.

 कुमार गटासाठी जन्म ०५/११/२००६ व त्यानंतरचा असावा; वजन ७५ किलोच्या आत तर कुमारीसाठी जन्म ३०/११/२००६ नंतरचा असावा; वजन ६५ किलोच्या आत असावे.

 इच्छुक संघानी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता सांगोला विद्यामंदिर, सांगोला येथे ओरिजिनल आधार कार्ड, वयाचा पुरावा म्हणून दहावी/बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला किंवा निर्गम उतारा आणि १ पासपोर्ट साईझ फोटो या आवश्यक कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे.

 इच्छुक संघांनी सचिन चव्हाण ( 7758959494) अथवा सुनील भोरे ( 9764045803) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मदन गायकवाड यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments