Breaking News

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना सोशल मीडिया नवी कार्यकारिणी जाहीर; २५३ पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना सोशल मीडिया नवी कार्यकारिणी जाहीर; २५३ पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी


सांगोला : शिवसेना पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील

 नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा पातळीपासून पंचायत समिती गणप्रमुखांपर्यंत एकूण २५३ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली 

असून, त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे देण्यात आली असल्याची माहिती सोशल मीडिया संपर्कप्रमुख अमित पाटील यांनी दिली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, 

पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या निवडी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया उपराज्यप्रमुख प्रतिक शर्मा, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सलवदे

 यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोशल मीडिया संपर्कप्रमुख अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत जिल्हा संपर्कप्रमुख एक, सोलापूर लोकसभा प्रमुख एक, माढा लोकसभा प्रमुख एक, जिल्हाप्रमुख एक, जिल्हा समन्वयक एक, जिल्हा संघटक एक, 

सोलापूर शहरप्रमुख एक, तालुका प्रमुख ११, विधानसभा प्रमुख ११, शहरप्रमुख १४, तालुका व शहर समन्वयक १३, 

जिल्हा परिषद गटप्रमुख ६८ आणि पंचायत समिती गणप्रमुख १३६ अशा एकूण २५३ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करणे, पक्षाची अधिकृत भूमिका डिजिटल माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविणे

 तसेच नागरिकांच्या प्रश्नांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडणे, 

अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या व्यापक कार्यकारिणीमुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 

सोशल मीडिया नेटवर्क अधिक सक्षम आणि प्रभावी होण्यास मदत होईल, असा विश्वास सोशल मीडिया संपर्कप्रमुख अमित पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments