Breaking News

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात पालक -शिक्षक सभा संपन्न

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात पालक -शिक्षक सभा संपन्न 


सांगोला ( प्रतिनिधी) आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात इयत्ता 10 वी च्या वर्गातील पालक -शिक्षक सभा 

उत्साहात संपन्न झाली. 

सुरुवातीस प्रशालेत  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम व पालक जमील शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यालय आपली जबाबदारी सातत्याने पार पाडत आहे; त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घरातूनही अभ्यासासाठी पोषक वातावरण, प्रोत्साहन आणि भावनिक पाठबळ मिळणे

 आवश्यक असल्याचे नमूद करत पालकांची सकारात्मक साथ मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या क्षमतेला योग्य दिशा देऊन त्यांना यशाच्या उंच शिखरावर पोहोचविता येईल असे प्रतिपादन मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांनी व्यक्त केले.

पालकांचे स्वागत प्रशालेतील सर्व शिक्षकांनी केले, यावेळी रजिया शेख, निंबाळकर या पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधित अध्यापन विभाग प्रमुखास केल्या 

यावेळी प्रशालेतील गोडसे, भालके मॅडम यांनी पालकांच्या शंकेचे निरसन करून उपयुक्त सूचना दिल्या 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुंभार सर यांनी केले

पालक सभेचे नियोजना करिता प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments