सांगोल्यात १४ ऑगस्टला भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली ‘हर घर तिरंगा’ अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा; तहसीलदार कुमारी बाळूताई भागवत यांचे आवाहन
सांगोला : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सांगोला शहरात १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली तहसील कार्यालय सांगोला येथून सुरू होणार आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सांगोला तालुक्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार सांगोला तहसील कार्यालयाच्या वतीने तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीमध्ये सांगोला शहरातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. संबंधित कार्यालय प्रमुख तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलसह
तहसील कार्यालय सांगोला येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, अशा सूचना तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
तहसीलदार कुमारी बाळूताई भागवत यांचे आवाहन
“हर घर तिरंगा” अभियान हे देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारे अभियान आहे. सांगोला तालुक्यातील नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवावा आणि १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा मोटारसायकल रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार कुमारी बाळूताई भागवत यांनी केले आहे.
या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे.
रॅलीचा प्रारंभ : तहसील कार्यालय, सांगोला
दिनांक : १४ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १० वाजता
उपक्रम : भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली
प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments