Breaking News

गावडेवाडी-सावे येथे माण नदीचे पाणी दाखल; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

गावडेवाडी-सावे येथे माण नदीचे पाणी दाखल; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख 


सांगोला : ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील गावडेवाडी व सावे परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घटना घडली आहे.

 माण नदीत मोठ्या विसर्गाने सोडण्यात आलेले पाणी अखेर गावडेवाडी-सावे परिसरात पोहोचले असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी माण नदीचे पाणी जीवनदायी ठरत आहे.

 पाण्याची मागणी आणि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

माण नदीचे पाणी, फाटा क्रमांक ५, तसेच टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि जिहे-कटापूर यांसारख्या विविध पाणी योजनांचा सांगोला तालुक्याला लाभ मिळावा, 

यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मे महिन्यापासून आतापर्यंत माण नदीला तीन वेळा पाणी आल्याचा दावा करण्यात येत असून, प्रचंड दुष्काळाच्या परिस्थितीत माणगंगेला वारंवार पाणी मिळणे ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.

गावडेवाडी-सावे परिसरात पाणी पोहोचताच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शेती, पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने त्रस्त असलेल्या ग्रामीण भागाला या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

“संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून पाण्यासाठी पाठपुरावा करणारे नेतृत्व” अशी भावना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. आता माण नदीचे पाणी पुढील भागातील शेतकऱ्यांपर्यंतही पुरेशा प्रमाणात पोहोचावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments