शहाजीबापू पाटील सोशल मंचाची जिल्ह्यात नवी जबाबदारी; तानाजी भोसले यांची संपर्कप्रमुखपदी निवड
सांगोला / प्रतिनिधी : माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विचारांना आणि सामाजिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या
‘मा. आ. शहाजीबापू पाटील सोशल मंचा’च्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी तानाजी भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
मंचाच्या माध्यमातून तालुकास्तरावर विविध सामाजिक उपक्रम राबविणे, नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे
तसेच युवक आणि कार्यकर्त्यांना संघटित करण्याच्या उद्देशाने तालुकानिहाय मंचाची उभारणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मंचाच्या कामकाजाला गती देण्यासाठी तानाजी भोसले यांच्यावर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तानाजी भोसले हे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित
असून, त्यांच्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी आगामी काळात मंचाच्या संघटनात्मक विस्तारासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
निवडीची घोषणा होताच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी तानाजी भोसले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात मंचाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आपण सक्रियपणे काम करणार असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले.


0 Comments