Breaking News

सांगोला बनकर मळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २७.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त नऊ जण ताब्यात; १० मोबाईल, रोकड, जुगाराचे कॉईन व वाहनांचा समावेश

सांगोला बनकर मळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २७.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त नऊ जण ताब्यात; १० मोबाईल, रोकड, जुगाराचे कॉईन व वाहनांचा समावेश


सांगोला / विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरालगतच्या बनकर मळा परिसरात करमणूक केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर सांगोला पोलिसांनी धडक कारवाई केली. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या

 या कारवाईत पोलिसांनी तब्बल २७ लाख ७८ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पसार झाल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बनकर मळा परिसरातील एका हॉलसदृश खोलीवर पथकाने छापा टाकला. घटनास्थळी 

‘शिवतेज स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, करमणूक केंद्र’ असा फलक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. ठिकाणी पैशांच्या मोबदल्यात जुगार सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत शेखर शिवाजी बनकर (३०), शिवाजी ज्ञानदेव बनकर (६०), संदीप दत्तात्रय राऊत (३०), दत्तात्रय नागनाथ हजारे (३९), समाधान अंबादास कुंभार

 (४०), रमेश वसंत देवळे (२९), लखन रतन झेंडे (३५), राहुल दिगंबर जगताप (५५) आणि बबन विठोबा साळुंखे (७१) यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

छाप्यात ३ लाख ५६ हजार रुपये किमतीचे १० मोबाईल, २२ हजार १० रुपये रोख, जुगारासाठी वापरण्यात येणारे विविध रंगांचे प्लास्टिक कॉईन,

 रजिस्टर तसेच सुमारे २४ लाख रुपये किमतीची विविध वाहने पोलिसांनी जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २७ लाख ७८ हजार १० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जुगाराच्या व्यवहाराशी संबंधित नोंदी असलेले रजिस्टरही पोलिसांच्या हाती लागले आहे. कारवाईचे व्हिडिओ शूटिंग व छायाचित्रण साक्ष प्रणालीमध्ये करण्यात आल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप नामदेव गुरव करीत आहेत.

दरम्यान, करमणूक केंद्राच्या नावाखाली नेमका कोणत्या स्वरूपाचा जुगार सुरू होता आणि पोलिसांच्या कारवाईपूर्वी घटनास्थळावरून पसार झालेले व्यक्ती कोण होते, याचा तपास सुरू असून या प्रकरणात पुढे आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments