Breaking News

फाटा क्रमांक ५ ला अखेर पाणी; आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

फाटा क्रमांक ५ ला अखेर पाणी; आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश


सांगोला : पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या फाटा क्रमांक ५ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर फाटा क्रमांक ५ ला पाणी सोडण्यात आले आहे.

माण नदीला पाणी सोडल्यानंतर फाटा क्रमांक ५ वरील शेतकऱ्यांनीही पाणी सोडण्याची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत 

आमदार देशमुख यांनी संबंधित अधिकारी तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्यातील पाणीस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणीही त्यांनी मांडल्या.

यापूर्वीच माण नदी व कोरडा नदीला पाणी सोडण्याची मागणी आमदार देशमुख यांनी सभागृहात केली होती. त्यानंतर फाटा क्रमांक ५ च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठीही पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला.

आमदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून फाटा क्रमांक ५ ला पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याची माहिती मिळताच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आभार मानले.

शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आमदार देशमुख यांच्या कामाचे कौतुक होत असल्याची माहिती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments