डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ६७ वी जयंती उत्साहात साजरी
सांगोला : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा राज्याचे ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शंकर धसाडे, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अशोक कांबळे, ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. पांडुरंग रुपनर,
प्रा. मारुती हाके, प्रा. अशोक वाकडे आदी मान्यवरांच्या हस्ते मा. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अशोक कांबळे यांनी अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव करताना राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, प्रशासनावरील त्यांची मजबूत पकड,
कार्यक्षमता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यांचा विशेष उल्लेख केला.
विद्यार्थ्यांनी समाजसेवा, नेतृत्वगुण आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा आदर्श त्यांच्या कार्यातून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शंकर धसाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महाविद्यालयीन जीवनात केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता सामाजिक जाणीव,
नेतृत्व कौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या लोकनेत्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अनिकेत देशमुख, संस्था सदस्या डॉ. सौ. आस्था अनिकेत देशमुख तसेच संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पांडुरंग रुपनर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. मारुती हाके यांनी मानले. या प्रसंगी
प्रा. प्रशांत करांडे, प्रा. सुशील रणदिवे, श्री. शंकर रणदिवे, श्री. दशरथ रणदिवे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments