वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात अजितदादा पवार जयंती साजरी.अजितदादांचा वक्तशीरपणा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत :–निलकंठ शिंदे सर
सांगोला ( प्रतिनिधी) आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीस प्रशालेत स्व अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी जयंती निमित्त मनोगत व्यक्त करताना संस्था सचिव निलकंठ शिंदे सर यांनी अजितदादा पवार यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देत
अजितदादा यांच्या कार्याची पद्धत, वक्तशीरपणा व परखड व्यक्तिमत्त्वाचे पैलू विद्यार्थ्यांना सांगून प्रशासनावर असणारी पकड व सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य आदर्श , दादांचा वक्तशीरपणा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटाअसल्याचे गौरवोउद्गार शिंदे सर यांनी मनोगतात सांगितले
यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुयोग बनसोडे सर यांनी केले .



0 Comments