Breaking News

मेथवडे फाटा येथे वारकऱ्यांच्या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी हजारो भाविकांना चरणसेवा व आरोग्यसेवा मा. दिपकआबा साळुंखे पाटील

मेथवडे फाटा येथे वारकऱ्यांच्या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी हजारो भाविकांना चरणसेवा व आरोग्यसेवा मा. दिपकआबा साळुंखे पाटील 


सांगोला | तालुका प्रतिनिधी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मेथवडे फाटा येथील नक्षत्र मंगल कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराला पहिल्याच दिवशी

 वारकऱ्यांचा उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला. हजारो वारकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्य तपासणी, औषधोपचार, चरणसेवा तसेच भोजन-अल्पोपहाराचा लाभ घेतला.

या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रदीपदादा साळुंखे पाटील आणि विजयराव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप नेते बाळासाहेब एरंडे, 

ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, नगरसेविका तनुजा एरंडे, डॉ. सचिन गवळी, डॉ. राज मिसाळ, अभिजित नलवडे, अमोल नलवडे तसेच वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरादरम्यान पायी वारी करणाऱ्या भाविकांच्या पायांना आयुर्वेदिक तेलाने मालिश करून चरणसेवा करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य तपासणी, 

आवश्यक औषधांचे वाटप, भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. पावसाचा विचार करून वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी आणि विश्रांतीसाठीही योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्वतः वारकऱ्यांची चरणसेवा करत सेवाभावाचा आदर्श घालून दिला. त्यांनी राज्याचे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अर्पण केल्या तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

या शिबिरात डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री फार्मसी कॉलेज, मेथवडे आणि फॅबटेक फार्मसी कॉलेज, सांगोला येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनी वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा दिली.

ज्ञानबा-तुकारामांच्या गजरात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने हे शिबिर २२ व 

२३ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

चौकट : अध्यात्मिक परंपरेचा सेवेतून सन्मान

कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांची वारकरी परंपरा पुढे नेत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी

 स्वतः वारकऱ्यांच्या पायांना आयुर्वेदिक तेल लावून मालिश करत चरणसेवा केली. दरवर्षी शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मरणार्थ आळंदी ते पंढरपूर दिंडीचे आयोजनही करण्यात येते.

चौकट : सेवाभावाबद्दल वारकऱ्यांकडून समाधान

वारीच्या कठीण प्रवासात आरोग्यसेवा, औषधोपचार, भोजन, अल्पोपहार आणि विश्रांतीची व्यवस्था उपलब्ध झाल्याने अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

अशा सेवाभावी उपक्रमांमुळे वारी अधिक सुखकर होत असल्याच्या भावना वारकरी बांधवांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments