वारवारकऱ्यांच्या सेवेत मा.अतुल मालक पवार; आषाढी वारीत खाऊ-फराळ वाटपाचा सेवाभावी उपक्रम
सांगोला प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी
जिल्हा परिषद सदस्य अतुल मालक पवार (जवळा गट) यांच्या पुढाकारातून खाऊ व फराळ वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
'ज्ञानबा-तुकाराम'च्या अखंड गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना प्रेमाने खाऊ व फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अतुल पवार यांनी वारकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या प्रवासाची विचारपूस केली.
वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा विठ्ठलभक्तीचा आनंद आणि समाधान अनुभवणे हीच मोठी प्रेरणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना अतुल मालक पवार म्हणाले, "मायबाप जनतेची आणि वारकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे.
समाजसेवेचा हा प्रवास भविष्यातही अशाच सेवाभावी उपक्रमांद्वारे सुरू राहील."
या उपक्रमाचे वारकरी बांधवांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
आषाढी वारीसारख्या पवित्र सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.


0 Comments