Breaking News

जत–पुणे नवीन बससेवेचा शुभारंभ; पेढे भरवून, नारळ फोडून चालकाचा उत्स्फूर्त सत्कार मा. परमेश्वर गेजगे (सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस, सांगोला तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष),

जत–पुणे नवीन बससेवेचा शुभारंभ; पेढे भरवून, नारळ फोडून चालकाचा उत्स्फूर्त सत्कार


मा. परमेश्वर गेजगे (सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस, सांगोला तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष),

सांगोला | प्रतिनिधी जत–येळवी–हंगिरंग–घेरडी–जवळा–कडलास–सांगोला–नातेपुते–अकलूज–फलटण–पुणे या मार्गावर नव्याने सुरू झालेल्या एसटी बससेवेचे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. 

या नव्या बससेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पुण्याशी थेट संपर्काची सोय उपलब्ध झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी बसचे चालक यांचा पेढे भरवून, नारळ फोडून व पुष्पहार अर्पण करून जाहीर सत्कार करण्यात आला. नव्या बससेवेच्या शुभारंभावेळी उपस्थितांनी चालक व वाहक यांना शुभेच्छा देत सुरक्षित आणि यशस्वी सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास परमेश्वर गेजगे (सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस, सांगोला तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), रघुनाथ गुजले, उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष, समाधान गेजगे तसेच परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन बससेवा सुरू झाल्याने या मार्गावरील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची प्रवासाची गैरसोय दूर होणार असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments