वाढदिवसाचे औचित्य; सांगोला नगरपरिषदेची हरित शहराच्या दिशेने मोठी पाऊलवाट
मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पाच वर्षांत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प
सांगोला | प्रतिनिधी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम राबवला.
लिंगायत स्मशानभूमी, जुना मेडशिंगी रोड तसेच यल्लमादेवी मंदिर परिसर (माळवाडी रोड) येथे विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी सांगोला शहर पुढील पाच वर्षांत एक लाख वृक्षांनी हिरवेगार करण्याचा संकल्प नगरपरिषदेने व्यक्त केला. पर्यावरण संरक्षण,
स्वच्छता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
वृक्षारोपण कार्यक्रमात उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, गटनेते प्रशांत धनवजीर, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर तेली, महिला व बालकल्याण सभापती सौ. छायाताई मेटकरी,
सदस्या सौ. आशादेवी यावलकर तसेच सदस्य काशिलिंग गावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी लिंगायत समाजाच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात
महात्मा बसवेश्वर संघटनेचे अध्यक्ष सुमित चांदणे, एम. व्ही. अध्यक्ष रत्नकर पाटणे, मनोज उकळे, अमर लोखंडे, निलेश नष्टे आणि संतोष महिमकर यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला नगरपरिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी महेश राजपूत, सिटी कोऑर्डिनेटर अजितकुमार पवार, वृक्ष प्राधिकरण विभागाचे आरिफ मुलाणी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरित सांगोला घडविण्याच्या दिशेने नगरपरिषदेने उचललेले हे पाऊल नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारे ठरले.


0 Comments