Breaking News

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी त्वरित नोंदणी करावी : डॉ. अनिकेत देशमुख नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी पूर्ण केलेल्या पाच जिल्ह्यांतील नागरिकांना आवाहन

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी त्वरित नोंदणी करावी : डॉ. अनिकेत देशमुख नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी पूर्ण केलेल्या पाच जिल्ह्यांतील नागरिकांना आवाहन


सांगोला | प्रतिनिधी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पात्र पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले आहे.

ते म्हणाले की, नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी प्राप्त केलेले तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील रहिवासी असलेले पदवीधर पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहेत.

पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे. मतदार यादीत नाव नोंदवल्यामुळे मतदानाचा घटनात्मक हक्क सुरक्षित राहतो आणि सुशिक्षित मतदार म्हणून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान देता येते, असेही त्यांनी नमूद केले.

अर्ज सादर करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता पात्र पदवीधरांनी लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments