Breaking News

म्हैसाळ योजनेच्या रखडलेल्या कामांना गती; आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी

म्हैसाळ योजनेच्या रखडलेल्या कामांना गती; आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाच्या रखडलेल्या कामांची 

आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

 संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी चर्चा करत आठवडाभरात अपूर्ण कामे पूर्ण करून पाणी सोडण्याची कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी वायफळ (ता. जत) येथील मुख्य कालव्यापासून नराळे, हबीसेवाडी, यमगरवाडी, मानेवाडी, घेरडी, वाकी, वाणी चिंचाळे, जवळा, आगलावेवाडी, तरंगेवाडी,

 भोपसेवाडी, आलेगाव आणि मेडशिंगी या परिसरातील सुरू असलेल्या सिंचन कामांची त्यांनी सविस्तर पाहणी केली.

 कामांच्या प्रगतीचा आढावा घेताना अधिकाऱ्यांकडून कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत माहिती घेतली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आठवडाभरात रखडलेली कामे पूर्ण करून तत्काळ कालव्यातून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. 

या योजनेमुळे सांगोला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.

आमदार दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले, "म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही केवळ विकासकाम नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या आशा-अपेक्षांशी निगडित आहे. 

प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या शेतापर्यंत म्हैसाळचे पाणी पोहोचेपर्यंत माझा पाठपुरावा कायम राहील. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठीचा संघर्ष सुरूच राहणार आहे."

म्हैसाळ योजनेची रखडलेली कामे मार्गी लागण्याच्या हालचालींमुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले 

असून लवकरच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments