महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ऑर्थोपेडिक इम्प्लांट खरेदीवर प्रश्नचिन्ह; करार रद्द करणार का? – आ. डॉ. भाई बाबासाहेब देशमुख


मुंबई | दि. १ जुलै २०२६ पावसाळी अधिवेशनात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑर्थोपेडिक

 इम्प्लांट (वैद्यकीय कृत्रिम अवयव व उपकरणे) खरेदी प्रक्रियेवर आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले.

गरीब व गरजू रुग्णांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद करत, २१ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या 

ऑर्थोपेडिक इम्प्लांटच्या निविदांमध्ये काही उपकरणांच्या किंमती बाजारभावापेक्षा जास्त असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

निविदा प्रक्रियेदरम्यान अपेक्षित स्पर्धा न होता विशिष्ट दोन कंपन्यांनाच कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करत, 

त्यामुळे शासनाला बाजारभावापेक्षा अधिक दराने इम्प्लांट खरेदी करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर संबंधित करारांची चौकशी करून ते रद्द करण्यात येणार आहेत का, तसेच भविष्यात पारदर्शक व स्पर्धात्मक

 निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी शासन कोणती पावले उचलणार, असा थेट सवाल आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला.