Breaking News

पत्रकारांच्या सन्मानासाठी संघटनांचा एल्गार; तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन

पत्रकारांच्या सन्मानासाठी संघटनांचा एल्गार; तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन


सांगोला (प्रतिनिधी): पत्रकारांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे, धमकी देणे आणि अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करत द जर्नलिस्ट असोसिएशन, राष्ट्रीय पत्रकार संघटना व पत्रकार सुरक्षा समिती (महाराष्ट्र)

 यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तहसीलदार कु. बाळूताई भागवत आणि सांगोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना निवेदन देण्यात आले.

पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार आणि द जर्नलिस्ट असोसिएशनचे कायदेशीर विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲड. अयुब पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

 निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांनी सार्वजनिक कार्यक्रमात पत्रकारांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर दबाव आणण्याचा किंवा धमकावण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

संबंधित प्रकरणाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी प्रताप येलपले, मिर्झागालिब मुजावर, मिनाज खतीब, बबन चव्हाण, बाळासाहेब वाघमारे, गुलचंद भोरे, सचिन मंडले, दीपक होवाळ, तनवीर मुजावर, शशिकांत हातेकर, शिवाजी इंगोले, कुलदीप होवाळ यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा कायम राहणार – ॲड. अयुब पटेल

यावेळी बोलताना ॲड. अयुब पटेल म्हणाले, "पत्रकारांचा अपमान किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे. 

अशा घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. पत्रकारांच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कायदेशीर व लोकशाही मार्गाने ठामपणे लढा सुरू ठेवू."

Post a Comment

0 Comments