सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. आमदार डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मा.अनिकेतभैय्या देशमुख
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, ज्येष्ठ समाजसेवक व माजी
आमदार स्व. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक व स्मरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सहा दशकांहून अधिक काळ समाजसेवेसाठी वाहिलेले त्यांचे जीवन आजही सांगोला तालुक्यासाठी प्रेरणादायी मानले जाते. स्वाभिमान, निःस्वार्थ समाजसेवा, गरीब व वंचित घटकांच्या
न्यायासाठी केलेला संघर्ष आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे स्व. भाई देशमुख यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पुण्यस्मरणानिमित्त सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत भजन-कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ह.भ.प. सागर महाराज बोराटे (नातेपुते) यांचे कीर्तन होणार आहे.
त्यानंतर दुपारी १२.०५ वाजता पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडणार असून, दुपारी १२.१५ पासून महाप्रसाद (भोजन) आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम स्व. आम. भाई गणपतरावजी देशमुख समाधीस्थळ, स्व. आम. भाई गणपतरावजी देशमुख सह. सून स्मृती, सांगोला येथे होणार असून, सर्व नागरिकांनी उपस्थित राहून स्व. भाई देशमुख यांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना, सांगोला यांच्यावतीने आयोजन करण्यात आले असून, देशमुख परिवारासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


0 Comments