Breaking News

'मातोश्री'वर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; शिवसेना उपनेते शरद कोळी व मा.तुषार इंगळे यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

'मातोश्री'वर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; शिवसेना उपनेते शरद कोळी व मा.तुषार इंगळे यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली 


 सदिच्छा भेट

मुंबई | प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त

 सोमवारी 'मातोश्री' निवासस्थानी शिवसैनिक, पदाधिकारी आणि विविध लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

या उत्साही वातावरणात शिवसेना उपनेते शरद कोळी यांनीही 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी शरद कोळी यांनी पुष्पगुच्छ व शाल अर्पण करून उद्धव ठाकरे यांचा सन्मान केला. 

तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती,

 जनतेसमोरील विविध प्रश्न आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद कोळी म्हणाले, "उद्धव साहेब हे लाखो शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक सक्षमपणे पुढे वाटचाल करत असून,

 त्यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण एकदिलाने काम करत राहू."

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री'वर दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राज्याच्या विविध भागांतून आलेले 

पदाधिकारी, आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते यांनीही उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments