Breaking News

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आमदार शहाजीबापू पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदिच्छा भेट; मतदारसंघातील विकासकामांवर सविस्तर चर्चा

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आमदार शहाजीबापू पाटील यांची


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदिच्छा भेट; मतदारसंघातील विकासकामांवर सविस्तर चर्चा

मुंबई | प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सांगोला मतदारसंघातील विविध प्रलंबित तसेच प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, 

सार्वजनिक सुविधा आणि इतर विकास प्रकल्पांबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देत संबंधित कामे शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी झालेल्या या भेटीमुळे मतदारसंघातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments