Breaking News

भाविकांसाठी आनंदाची बातमी! श्री काळभैरवनाथ दर्शनासाठी विशेष एस.टी. बस सेवेचा शुभारंभ आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यावर भाविकांकडून कौतुकाचा वर्षाव

भाविकांसाठी आनंदाची बातमी! श्री काळभैरवनाथ दर्शनासाठी विशेष एस.टी. बस सेवेचा शुभारंभ  आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यावर भाविकांकडून कौतुकाचा वर्षाव 


जवळा | प्रतिनिधी सांगोला तालुका व पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ यांच्या दर्शनासाठी पौर्णिमेनिमित्त विशेष एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. 

या विशेष बस सेवेचा शुभारंभ आज जवळा येथे डॉ. प्रदीप (दादा) साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते पूजा करून व नारळ फोडून करण्यात आला.

ही बस सेवा सुरू होण्यासाठी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि भाविकांच्या सोयीसाठी घेतलेली सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरली.

 त्यांच्या प्रयत्नांमुळे हजारो भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारी वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे.
विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान मुले तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 

पूर्वी प्रवासासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता विशेष एस.टी. बस सेवेच्या माध्यमातून भाविकांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

"भाविकांची सेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, परिसरातील नागरिक आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या सेवेसाठी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यावर भाविकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, श्री काळभैरवनाथांच्या चरणी त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवेसाठी भाविकांनी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments