Breaking News

सांगोला माण नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर डीवायएसपी पथकाचा धडक छापा; ५.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला माण नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर डीवायएसपी पथकाचा धडक छापा; ५.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील माण नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात मंगळवेढा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली.

 या कारवाईत सुमारे ५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालक, मालक आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे.

 या मोहिमेदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगोला तालुक्यातील लोटेवाडी परिसरात सापळा रचला.

यावेळी संशयास्पद टमटम वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. 

मात्र चालक आणि त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले.

तपासणीदरम्यान वाहनात सुमारे एक ब्रास अवैध वाळू आढळून आली. पोलिसांनी अशोक लेलँड कंपनीचे टमटम वाहन (किंमत ५ लाख ७७ हजार रुपये), अंदाजे ७ हजार रुपयांची वाळू आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी वाहन चालक दादा कांबळे, वाहन मालक बंटी कांबळे (रा. अचकदाणी) तसेच अन्य दोन अनोळखी

 व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments