सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धेतील विजेत्यांचा आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते गौरव
नाविन्यपूर्ण रील स्पर्धेतून मॅरेथॉनचा संदेश घराघरात; विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान
सांगोला | प्रतिनिधी सांगोला मॅरेथॉन-२०२६च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी, सांगोला डॉक्टर्स असोसिएशन आणि सुर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सांगोला मॅरेथॉनचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या उपक्रमाला युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गौरव सोहळ्यास आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख, सौ. निकिताताई देशमुख, चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, सुर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा अनिलभाऊ इंगोले,
विजय राऊत, डॉ. विजय बंडगर, डॉ. संगीता पिसे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, डॉ. महेश राऊत, डॉ. संतोष पिसे, डॉ. वैभव जांगळे, डॉ. निरंजन केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत उत्कृष्ट रील निर्मितीसाठी प्रथम क्रमांक सुशांत कोडक (एस. के. सिनेमॅटिक) यांना ₹५,००१, द्वितीय क्रमांक साहिल वाघमारे (द साहिलग्राफी) यांना ₹३,००१ आणि तृतीय क्रमांक आर्यन लीपारे (झिरो सिनेमॅटिक) यांना ₹२,००१ रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सिनेमॅटोग्राफर मकरंद भोरे, उमर बागवान आणि निलेश लोखंडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरशाद बागवान यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, “रील स्पर्धेसारख्या आधुनिक माध्यमांमुळे सांगोला मॅरेथॉनचा संदेश मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचला आहे.
अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक जनजागृतीला निश्चितच चालना मिळेल.” उपस्थित मान्यवरांनीही मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत तरुणांच्या सर्जनशील सहभागाचे कौतुक केले.


0 Comments