अशोक कामटे संघटनेच्यावतीने भाटेकर दाम्पत्यांचा सत्कार शिक्षणासोबत संस्कार आणि संस्कृतीची जपणूक करणारे या शाळेचे हे चित्र खऱ्या अर्थाने प्रेरणादायी :–निलकंठ शिंदे सर
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने SHVR अंतर्गत देशपातळीवर उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळा म्हणून मानाचा
बहुमान मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक भागवत भाटेकर व शितल भाटेकर यांचा शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला.
यावेळी संघटनेचे विजय (आबा) कांबळे यांनी दोन्ही या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सौ व श्री भाटेकर दांपत्यांचा शाल ,श्रीफळ व बुफे देऊन सत्कार करण्यात आला.
अशोक कामटे संघटनेने या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संस्कार आणि संस्कृतीची जपणूक करणारे
हे चित्र खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन निलकंठ शिंदे सर यांनी यावेळी व्यक्त केले. शाळेची गुणवत्ता, उपक्रम पाहून संघटनेच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
या शाळेने मिळवलेल्या राज्यस्तरीय यशाचा आदर्श सोलापूर जिल्ह्यातील इतर सर्व शाळांनी घ्यावा, या प्रकारे या शाळेची रचना व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचा पाया रचत असल्याचे तेजस कुरकुटे यांनी याप्रसंगी गौरव उद्गार काढले.
शिक्षणाची गुणवत्ता हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, प्रत्येक शाळा आदर्श आणि प्रत्येक पालकाचा विश्वास जपणे, हीच आमची बांधिलकी असल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक भागवत भाटेकर व पोळ मॅडम यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ, व शहीद अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments