Breaking News

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दोन नवीन 100 KVA डीपींचे लोकार्पण; अतुल (मालक) पवार यांच्या प्रयत्नांना यश

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दोन नवीन 100 KVA डीपींचे लोकार्पण; अतुल (मालक) पवार यांच्या प्रयत्नांना यश


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या 

दोन नवीन 100 KVA वीज वितरण (डीपी) प्रकल्पांचे रविवार, दि. 19 जुलै 2026 रोजी लोकार्पण होणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे सन 2025-26 अंतर्गत ही विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. 

यामुळे संबंधित गावांतील नागरिकांना कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार होणारे वीज खंडित होणे आणि वाढत्या वीजभाराच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकार्पण होणारी कामे पुढीलप्रमाणे आहेत:

कोळेकर–पुजारी डीपी, राजापूर (100 KVA)

वेळ: सकाळी 11.00 वा.

हजारे ते मारसाळ डीपी, वाडेगाव (100 KVA)

वेळ: दुपारी 4.00 वा.

या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार

 असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments