गोव्याचे कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर यांची सांगोला विद्यामंदिरला सदिच्छा भेट ३५ वर्षांची जीवाभावाची मैत्री आणि शाळेला भेट
सांगोला प्रतिनिधी ( सांगोला) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजला गोव्याचे कला, संस्कृती, क्रीडा, युवक व्यवहार व आदिवासी कल्याण
कॅबिनेट मंत्री मा.रमेश तवडकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. एका सामान्य कुटुंबातून येऊन आपल्या अफाट कष्टाने आणि सामाजिक बांधिलकीने उत्तुंग शिखरावर पोहोचलेले
एक संवेदनशील समाजसेवक अशी ओळख असणाऱ्या व्यक्तीत्वाने आपल्या या भेटीतून सांगोल्यात प्राचार्य चारूदत्त जगताप यांच्या मैत्रीचा एक अत्यंत प्रेरणादायी आणि अनोखा स्नेहबंध जपला.
याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते मंत्री महोदयांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्काराचा स्वीकार केल्यानंतर मंत्री महोदयांनीही
आपला मोठेपणा जपत संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर व आपले मित्र चारुदत्त जगताप यांची सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
यावेळी उपस्थित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर यांनी आपला २५ वर्षांचा आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि दोन वेळा मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास उलगडला.
क्रीडा शिक्षक ते कॅबिनेट मंत्री या यशोशिखरावर पोहोचताना आपण आपल्यातील शिक्षक नेहमी कसा जागृत ठेवला, हे त्यांनी अत्यंत अभिमानाने सांगितले. त्यांनी स्थापन केलेल्या बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून
आज ग्रामीण भागात निवासी शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय त्यांनी शेतीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांची जागतिक स्तरावर घेतलेली दखल
तसेच, श्रम-धाम या उपक्रमाच्या माध्यमातून लोकसहभागातून गरिबांसाठी घरे बांधून देण्याच्या त्यांच्या कार्याची पंतप्रधानांनी कौतुक करत घेतलेली दखल सांगत त्यांनी उपस्थित
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अनमोल प्रबोधन केले. या ऐतिहासिक आणि स्नेहमयी सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा संचालक जनक टेकाळे, प्राचार्य अशोक काळे,
प्राचार्य संजय हिरेकर, प्राचार्य दीपक अमोणकर, प्राचार्य विजयकुमार बोराडे, संस्थेचे सदस्य दिगंबर जगताप, प्राचार्य चारूदत्त जगताप,उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर,
काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले
■ *चौकट* : सत्तेच्या शिखरावरही दरवळला ३५ वर्षांच्या मैत्रीचा सुगंध..
राजकारणाच्या धकाधकीत आणि सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर माणसांनी आपली नाती कशी जपावीत याचा आदर्श कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर यांनी घालून दिला.
सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य चारुदत्त जगताप आणि गोव्याचे कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर हे वर्गमित्र
. तब्बल ३५ वर्षांपूर्वी क्रीडा मैदानावर आणि एकाच बाकावर बसून वर्गात फुललेली जीवाभावाची मैत्री आज मंत्रीपदाच्या वलयातही तितकीच घट्ट आणि नितळ आहे. लाल दिव्याच्या गाडीतून आलेले मंत्री जेव्हा आपल्या जुन्या मित्राच्या गळ्यात पडून
त्यांच्या प्राचार्यपदाचे कौतुक करत सत्कार करतात तेव्हा तिथे सत्ता नाही, तर केवळ जिव्हाळा उरतो.पदापेक्षा मैत्री आणि माणूस मोठा असतो असा काळजाला भिडणारा संदेश देणारी ही सदिच्छा भेट सांगोल्याच्या शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात कायम स्मरणात राहील.




0 Comments