सांगोला पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात बदल; मा.राहुल देशपांडे यांच्याकडे पोलीस निरीक्षकपदाची धुरा
सांगोला (प्रतिनिधी) : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील प्रशासकीय बदलांतर्गत
सांगोला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी राहुल पांडुरंग देशपांडे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार व जिल्हा
आस्थापना मंडळाच्या शिफारशीनंतर ही नियुक्ती करण्यात आली असून, गुरुवारी त्यांनी सांगोला पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला.
यापूर्वी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विनोद प्रभू घुगे यांची अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर नियंत्रण कक्षातून राहुल देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांगोला तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी ठेवणे, गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण, अवैध धंद्यांविरोधात निर्णायक कारवाई,
नागरिकाभिमुख पोलीस व्यवस्था आणि तक्रारदारांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सांगोला शहर व तालुक्यातील सामाजिक संस्था, व्यापारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त
पोलीस निरीक्षक राहुल पांडुरंग देशपांडे यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


0 Comments