Breaking News

मा.अतुल पवार यांच्या प्रयत्नांना यश; आलेगाव व मेडशिंगीत नवीन १०० केव्हीए डीपीचे उद्घाटन

मा.अतुल पवार यांच्या प्रयत्नांना यश; आलेगाव व मेडशिंगीत नवीन १०० केव्हीए डीपीचे उद्घाटन 


आज जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वीजपुरवठा अधिक सक्षम होणार; ग्रामस्थांमध्ये समाधान

सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील आलेगाव व मेडशिंगी परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समिती (DPDC) सोलापूरच्या निधीतून उभारण्यात आलेल्या दोन नवीन १०० केव्हीए वीज वितरण (डीपी) केंद्रांचे उद्घाटन रविवारी (दि. १२ जुलै) संपन्न होणार आहे. या कामांसाठी जिल्हा परिषद सदस्य अतुल मालक पवार यांनी विशेष पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.

पहिला उद्घाटन सोहळा बालाजी लवटे (लवटे वस्ती), आलेगाव येथे सकाळी ११ वाजता होणार असून, येथे १०० केव्हीए क्षमतेच्या नवीन डीपीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

त्यानंतर दुसरा उद्घाटन सोहळा आसबे वस्ती, मेडशिंगी येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणीही नव्याने उभारण्यात आलेल्या १०० केव्हीए डीपीचे उद्घाटन होणार आहे.

या दोन्ही कामांमुळे संबंधित वस्तीतील कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार होणारे वीज खंडित होणे आणि वाढलेल्या विद्युत भाराची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या कामांबद्दल समाधान व्यक्त करत, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अशाच प्रकारची विकासकामे सातत्याने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

चौकट :

उद्घाटन कार्यक्रम

१) बालाजी लवटे (लवटे वस्ती), आलेगाव

काम : १०० केव्हीए डीपी

दिनांक : रविवार, १२ जुलै २०२६

वेळ : सकाळी ११.०० वा.

२) आसबे वस्ती, मेडशिंगी

काम : १०० केव्हीए डीपी

दिनांक : रविवार, १२ जुलै २०२६

वेळ : दुपारी ४.०० वा.

Post a Comment

0 Comments