Breaking News

DPDC बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आक्रमक; सांगोल्याच्या पाणी व वीज प्रश्नांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

DPDC बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आक्रमक; सांगोल्याच्या पाणी व वीज प्रश्नांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे तातडीच्या कार्यवाहीचे आदेश


सोलापूर | प्रतिनिधी सोलापूर जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ठामपणे 

मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. विशेषतः शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी, वीजपुरवठा आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर त्यांनी जोरदार भूमिका घेतली.

बैठकीत त्यांनी ग्रामीण भागातील डीपी (ट्रान्सफॉर्मर) उपलब्धतेचा प्रश्न, नदीकाठच्या भागातील अतिरिक्त वीज लाईनची गरज तसेच 

अल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली.

यासोबतच टेंभू सिंचन योजना, म्हैसाळ योजना आणि नीरा उजवा कालवा क्रमांक ३, ४ व ५ मधून सांगोला तालुक्यास पाणी सोडण्याबाबतही त्यांनी बैठकीत ठोस पाठपुरावा केला.

आमदार देशमुख यांनी मांडलेल्या मागण्यांची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या बैठकीमुळे सांगोल्यातील शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, विशेषतः पाणी व वीज प्रश्नांच्या समाधानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments