Breaking News

सांगोल्याच्या पश्चिम भागाचा बदलणार चेहरामोहरा; डेकोरेटिव्ह लाईटसाठी १ कोटींचा निधी मंजूर

सांगोल्याच्या पश्चिम भागाचा बदलणार चेहरामोहरा; डेकोरेटिव्ह लाईटसाठी १ कोटींचा निधी मंजूर 


मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक मार्ग होणार प्रकाशमान; माळवाडी परिसराच्या विकासाला मिळणार नवी गती नगराध्यक्ष मा.आनंद भाऊ माने 

सांगोला : सांगोला शहराच्या पश्चिम भागाच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास या प्रमुख मार्गावर आकर्षक डेकोरेटिव्ह लाईट उभारण्यासाठी

सांगोला नगरपालिकेकडून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहराचे सौंदर्य वाढण्यासोबतच नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि प्रकाशमान प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाचे डेकोरेटिव्ह लाईट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे मिरज रोड बायपास, माळवाडी मार्ग आणि वंदे मातरम चौक परिसर अधिक आकर्षक दिसणार असून शहराच्या पश्चिम भागाला आधुनिक स्वरूप प्राप्त होणार आहे.

या विकासकामासाठी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असून लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्या विकासाभिमुख नियोजनामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला आहे.

 पश्चिम भागातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर नगरपालिकेने विशेष भर दिला आहे.
या कामासाठी नगरसेवक चैतन्य राऊत आणि नगरसेविका सीमा सरगर यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

 त्यांच्या प्रयत्नांमुळे हा विकास प्रकल्प मंजूर झाला असून पश्चिम भागातील नागरी विकासाला नवी चालना मिळणार आहे.

डेकोरेटिव्ह लाईट प्रकल्पामुळे शहराचे सौंदर्य खुलणार, वाहतुकीची सुरक्षितता वाढणार आणि माळवाडी परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

सांगोल्याच्या सर्वांगीण विकासात हा प्रकल्प महत्त्वाची भर ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments