Breaking News

सेवानिवृत्तांच्या सेवेचा सन्मान; माणगंगा परिवाराचा उद्या भव्य गौरव सोहळा नगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले

सेवानिवृत्तांच्या सेवेचा सन्मान; माणगंगा परिवाराचा उद्या


भव्य गौरव सोहळा नगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले

सांगोला प्रतिनिधी : समाजाच्या विकासासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी माणगंगा परिवार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, 

सांगोला यांच्या वतीने भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सांगोला नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी ही माहिती दिली.

शिक्षक, अधिकारी व कर्मचारी हे समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून त्यांनी आपल्या सेवाकाळात राष्ट्रनिर्मिती आणि समाजहितासाठी केलेले योगदान अतुलनीय आहे.

 विशेषतः शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत त्यांच्यामध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे मोलाचे कार्य करतात.

 त्यामुळे अशा सेवाभावी व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी असल्याची भावना व्यक्त करत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री. इंगोले यांनी सांगितले.

माणगंगा परिवार ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि सहकार क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. सांगोला, मंगळवेढा, वाकी (शिवणे), हातीद, नाझरे, 

महूद यासह परिसरातील विविध भागांमध्ये संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. हजारो सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्य करताना शेतकरी, व्यावसायिक, महिला बचत गट आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळकटी देण्याचे काम संस्था सातत्याने करत आहे.

या गौरव सोहळ्यास पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून शेतकरी शिक्षण मंडळाचे सचिव विठ्ठलराव शिंदे तसेच माजी शिक्षण अधिकारी तानाजी घाडगे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

सदर कार्यक्रम शनिवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता सांगोला येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एमबीएम मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आला आहे. 

तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरव सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

उपशीर्षक :

समाजासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान; मान्यवरांची राहणार उपस्थिती

Post a Comment

0 Comments