Breaking News

माजी नगरसेवक सिद्धेश्वर (नाथा) जाधव यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपरिषदेस वृक्ष भेट नागपरिषदेकडून शहरामध्ये वृक्षारोपण संपन्न

माजी नगरसेवक सिद्धेश्वर (नाथा) जाधव यांच्याकडून वाढदिवसानिमित्त



सांगोला नगरपरिषदेस वृक्ष भेट नागपरिषदेकडून शहरामध्ये वृक्षारोपण संपन्न 

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी नगरसेवक सिद्धेश्वर (नाथा) जाधव 

यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपरिषदेस विविध प्रकारची झाडे भेट म्हणून दिली होती. ती झाडे सांगोला नगरपरिषदेमार्फत काल शहरामध्ये नगरपरिषदेसमोरील दुभाजकामध्ये लावण्यात आली.

 यावेळी सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने, इंजि. उत्कर्ष पाटील, उद्योगपती यश जाधव, किरण मेटकरी, आरिफ मुलाणी, वैभव बडदे, यांच्यासह नगरपरिषदेकडील वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांनी आवाहन केल्याप्रमाणे माजी नगरसेवक सिद्धेश्वर जाधव यांनी नगरपरिषदेस झाडे भेट म्हणून दिल्याबद्दल नगराध्यक्ष आनंदा माने यांनी त्यांचे आभार मानले. 

तसेच शहरातील इतरही नागरिक, उद्योगपती यांनाही सांगोला नगरपरिषदेस वृक्ष भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments