Breaking News

सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; सहा गावांतील घरांचे नुकसान

सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; सहा गावांतील घरांचे नुकसान


सांगोला/ : तालुक्यात ५ जून रोजी सायंकाळपासून रात्रीपर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक गावांना तडाखा दिला. 

जोरदार वाऱ्यामुळे सहा गावांतील किमान सात घरांची पत्रे उडून गेली असून काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तहसील प्रशासनाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, नवी लोटेवाडी येथील मोरे वस्तीवर रात्री सुमारे ८.४७ वाजण्याच्या सुमारास

 झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उत्तम सुखदेव मोरे यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेली. त्यामुळे घराचे नुकसान झाले.

तसेच सावे गावातील जावीर वस्ती येथे सायंकाळी सुमारे ७.३० वाजता झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रभाकर तुकाराम जावीर यांच्या घरावरील पत्रे उडून 

जाऊन घराची पडझड झाली. चोपडी येथील जयराम मळा परिसरातही सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास शिवाजी ज्ञानेश्वर बाबर यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले.

याच वेळी सोनंद येथील स्टेशन रोड परिसरात धोंडीराम कांबळे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेली. घराचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, किडेबिसरी गावात रात्री सुमारे ९.१५ वाजता झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तानाजी तुकाराम रुपनर व धनाजी तुकाराम रुपनर

 यांच्या राहत्या घरांचेही नुकसान झाले. दोन्ही घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

तहसील प्रशासनाने संबंधित घटनांची प्राथमिक नोंद घेतली असून नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 प्रभावित कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांत नागरिकांची धावपळ उडाली होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटून पडल्याची माहिती असून,

 पुढील काही दिवस हवामान बदलते राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments