Breaking News

रक्तदानातून जीवनदान, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन!गुंडादादा खटकाळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

रक्तदानातून जीवनदान, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन!गुंडादादा खटकाळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार


सांगोला | प्रतिनिधी आजच्या काळात वाढदिवसांवर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श युवा सेना तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांनी घालून दिला आहे. 

त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. १५ जून रोजी महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते हे उपक्रम पार पडणार आहेत. 

गुंडादादा खटकाळे मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताची कमतरता भासू नये, या सामाजिक 

जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे.

दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे हे सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

सोमवार, दि. १५ जून रोजी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासमोर होणाऱ्या या कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,

 युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुंडादादा खटकाळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments