Breaking News

उद्योजक बाळासाहेब एरंडे यांचा आज वाढदिवस; शुभेच्छुकांच्या भेटीसाठी सायंकाळी कार्यालयात राहणार उपस्थित

उद्योजक बाळासाहेब एरंडे यांचा


आज वाढदिवस; शुभेच्छुकांच्या भेटीसाठी सायंकाळी कार्यालयात राहणार उपस्थित

सांगोला | प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते व नामवंत उद्योजक बाळासाहेब एरंडे यांचा आज (शनिवार, १३ जून) वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. 

वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बाळासाहेब एरंडे हे आज सायंकाळी ५ वाजल्यानंतर सांगोला–मिरज रोडवरील त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. 

त्यामुळे मित्रपरिवार, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे

 ही त्यांची विशेष ओळख आहे. शिक्षण, रोजगारनिर्मिती, सामाजिक कार्य तसेच विकासाभिमुख उपक्रमांना त्यांनी सातत्याने पाठबळ दिले आहे.

सांगोला तालुक्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी विविध माध्यमांतून योगदान दिल्यामुळे समाजातील विविध स्तरांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. 

त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक संस्था, संघटना आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments