Breaking News

डॉक्टर्स डे निमित्त सांगोल्यात राज्यस्तरीय मॅरेथॉन; ‘आरोग्यासाठी धावा’चा संदेश देत हजारो धावपटूंना निमंत्रण

डॉक्टर्स डे निमित्त सांगोल्यात राज्यस्तरीय मॅरेथॉन;


‘आरोग्यासाठी धावा’चा संदेश देत हजारो धावपटूंना निमंत्रण

सांगोला | प्रतिनिधी राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या औचित्य साधून सांगोला शहरात आरोग्य, तंदुरुस्ती आणि जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 सांगोला डॉक्टर असोसिएशन आणि सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै २०२६ रोजी

 भव्य राज्यस्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील धावपटू, युवक-युवती, विद्यार्थी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच फिटनेसप्रेमी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी ६ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथून मॅरेथॉनला प्रारंभ होणार असून देशमुख वस्ती मार्गे पुन्हा विद्यामंदिर प्रशाला येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे. 

“धावा आरोग्यासाठी, धावा उज्ज्वल भविष्यासाठी” या संदेशासह आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून समाजात सकारात्मक आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे.

या उपक्रमाला विविध सामाजिक संस्था, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पॉन्सरशिप व बक्षीस सहकार्यासाठी इच्छुकांनी आयोजक समितीशी संपर्क साधावा.

संपर्कासाठी :

डॉ. शिवराज भोसले – 9423327304

डॉ. संगीता पिसे – 9011410998

डॉ. नेहा पाटील – 9665046636

डॉ. वैभव जांगळे – 9921404095

डॉ. निरंजन केदार – 9145124579

डॉ. सचिन लिगाडे – 9420947087

अमोल जमदाडे – 9527061480

"एक पाऊल आरोग्याकडे... एक धाव निरोगी भारताकडे!" या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments