Breaking News

511 रक्तदात्यांचा विक्रम, समाजसेवेचा संदेश; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

511 रक्तदात्यांचा विक्रम, समाजसेवेचा संदेश;


उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सांगोला | प्रतिनिधी सामाजिक बांधिलकी, सहकार चळवळ आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक, एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन

 तथा सूर्योदय परिवाराचे कुटुंबप्रमुख उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी आणि हजारो शुभेच्छुकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सांगोला येथील सूर्योदय बँक्वेट हॉलमध्ये आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास मोठ्या प्रमाणात नागरिक, सहकारी, उद्योजक, 

सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘रक्तदान सप्ताह’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

 महाराष्ट्र व कर्नाटकातील एलकेपी मल्टीस्टेटच्या ४३ शाखांमधून आयोजित रक्तदान शिबिरांत तब्बल ५११ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श घालून दिला.

‘रेवनील ब्लड बँक’च्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. 

रक्तदानाबरोबरच वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, महिला तीर्थयात्रा, जलसंधारण, 

अन्नदान यांसारख्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमधून सूर्योदय परिवाराने समाजसेवेची परंपरा कायम ठेवली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने अनिलभाऊ इंगवले यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘आपुलकी प्रतिष्ठान’ 

या संस्थेला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सांगोला तालुक्यासह राज्यभरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित 

राहून किंवा दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी अनिलभाऊंच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमात विविध सामाजिक संस्था, मंडळे, पतसंस्था, शिक्षक संघटना, माजी सैनिक संघटना आणि युवक मंडळांनी सहभाग घेत

 अनिलभाऊ इंगवले यांना शुभेच्छा अर्पण केल्या. वाढेगाव येथील विठ्ठल भजनी मंडळाने संतांच्या वेशभूषेत केलेला विशेष सत्कार उपस्थितांचे आकर्षण ठरला.

समाजकारण आणि उद्योग क्षेत्राचा समतोल साधत सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या सूर्योदय परिवाराच्या कार्याचे यावेळी सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

 कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सूर्योदय उद्योग समूह, एलकेपी मल्टीस्टेट तसेच सर्व कर्मचारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments