सांगोल्यात प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर धाड; पानटपरी चालकासह पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरातील सनगर गल्ली परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत तब्बल ९ हजार १८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पानटपरी चालकासह पुरवठादाराविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकारी उमेश सुभाष भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश प्रभाकर सासणे (रा. सनगर गल्ली, सांगोला) व पुरवठादार अनिल मस्के (रा. सांगोला) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक ११ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास सनगर गल्ली येथील पानमसाला स्टोअर्सवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत विमल, आरएमडी,
, सुपर जेम पानमसाला, विविध प्रकारची सुगंधित तं
बाखू, खैनी, सुखा मावा तसेच विनालेबल तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत ९,१८३ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यात गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन,
वाहतूक, साठा व विक्रीवर बंदी आहे. असे असतानाही संबंधितांनी आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित पदार्थांचा साठा करून विक्रीसाठी ठेवला असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत. :::
चौकट :
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ९,१८३ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त


0 Comments