Breaking News

मंगळवेढा-सांगोला महामार्गावर भीषण अपघात; क्रेटा कारची जेसीबीला धडक, दोन ठार, तिघे गंभीर

मंगळवेढा-सांगोला महामार्गावर भीषण अपघात; क्रेटा कारची


जेसीबीला धडक, दोन ठार, तिघे गंभीर

मंगळवेढा प्रतिनिधी : मंगळवेढा-सांगोला राष्ट्रीय महामार्गावर आंधळगाव हद्दीत रविवारी (८ जून) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, 

तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगातील क्रेटा कारने समोर चाललेल्या जेसीबीच्या मागील बकेटला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता धरणवाडी येथील पांडुरंग भाकरे यांच्या शेताजवळ घडला. 

आंधळगाव येथे काम पूर्ण करून जेसीबी मशीन घेऊन गणेशवाडी (ता. मंगळवेढा) येथील अनिल अशोक तानगावडे (वय ३७) हे घरी परतत होते. त्यावेळी मागून आलेल्या क्रेटा कारने जेसीबीच्या मागील बकेटला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, क्रेटा कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. अपघाताच्या जोरामुळे जेसीबीही रस्त्याच्या कडेला गेली.

 या घटनेत कार चालक सुरज अशोक पाटील (रा. शेने, ता. वाळवा, जि. सांगली) व अर्चना अशोक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

तर कारमधील निता सुरज पाटील, अशोक तुकाराम पाटील आणि आयुष अंकुश पाटील हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने आंधळगाव येथील नडगिरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत जेसीबी चालक अनिल तानगावडे यांनाही दुखापत झाली आहे.

याप्रकरणी अनिल तानगावडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भरधाव व निष्काळजी वाहनचालना केल्याप्रकरणी मृत चालक सुरज पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा पोलीस पुढील तपास करत आहेत.

चौकट:

मंगळवेढा-सांगोला महामार्गावर मृत्यूचा सापळा; क्रेटा कारची जेसीबीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव वेग ठरला जीवघेणा! कार-जेसीबी अपघातात दोन ठार, तिघे गंभीर

आंधळगावजवळ भीषण दुर्घटना; क्रेटा कारचा चक्काचूर, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

राष्ट्रीय महामार्गावर थरारक अपघात; सांगलीतील दोन जणांचा मृत्यू, तिघे जखमी

Post a Comment

0 Comments