Breaking News

आकाशवाणी सोलापूरवर विद्रोही कवी ॲड. महादेव कांबळे यांची विशेष मुलाखत ‘साहित्य संपदा’ कार्यक्रमात उद्या सायंकाळी ८.२० वाजता होणार प्रसारण

आकाशवाणी सोलापूरवर विद्रोही कवी ॲड. महादेव कांबळे यांची विशेष मुलाखत ‘साहित्य संपदा’


कार्यक्रमात उद्या सायंकाळी ८.२० वाजता होणार प्रसारण

सांगोला : महाराष्ट्रातील प्रख्यात विद्रोही व सामाजिक कवी ॲड. महादेव कांबळे यांची विशेष प्रकट मुलाखत 

 दि. ९ जून रोजी सायंकाळी ८ वाजून २० मिनिटांनी आकाशवाणी सोलापूर केंद्रावरील ‘साहित्य संपदा’ या लोकप्रिय कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या कवितांद्वारे सामाजिक प्रबोधन करणारे कवी म्हणून 

ॲड. महादेव कांबळे यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांनी समाजमनावर ठसा उमटविला आहे.

‘भाकरी की चंद्र?’, ‘आई मला उमलू दे’, ‘उतरंड’ आणि ‘वेदनांकित घुंगरांचे संदर्भ’ हे त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 

त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. भाग-१ मराठी अभ्यासक्रमात त्यांच्या एका कवितेचा समावेश करण्यात आला होता.

सन २०१९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित बहुभाषिक कवी संमेलनात त्यांनी मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केले होते. 

त्यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि काव्यप्रवासाचा वेध घेणारी ही मुलाखत आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी अश्विनी वाघमोडे यांनी घेतली आहे.

साहित्यप्रेमी, काव्यरसिक आणि श्रोत्यांनी या विशेष मुलाखतीसह ॲड. महादेव कांबळे यांच्या निवडक कवितांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट:

विद्रोही कवितेचा प्रवास आकाशवाणीवर उलगडणार

साहित्य, समाजप्रबोधन आणि काव्याचा वेध

प्रसिद्ध कवी ॲड. महादेव कांबळे यांच्याशी मनमोकळी बातचीत

Post a Comment

0 Comments