Breaking News

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने सांगोला तालुका हादरला; शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या कृषिमंत्र्यांकडे मागणी— आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने सांगोला तालुका हादरला;


शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या कृषिमंत्र्यांकडे मागणी— आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला, जि. सोलापूर : सांगोला तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. 

या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुंबईत कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेत तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार डॉ. देशमुख यांनी सांगितले की, तालुक्यातील चोपडी, नाझरे, बलवडी, सोमेवाडी, हातीद, उदनवाडी, गौडवाडी आदी गावांसह परिसरात गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

 विशेषतः डाळिंब, द्राक्ष, पेरू तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक फळबागांमधील संरक्षक जाळ्या फाटल्या आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत.

वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे महसूल

 आणि कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत मंजूर करावी, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. देशमुख यांनी केली.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे

 सकारात्मक आश्वासन दिले. यानंतर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कृषिमंत्र्यांचे आभार मानत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments