प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष
सांगोला (प्रतिनिधी): सांगोले नगरीचे माजी नगराध्यक्ष,विरशैव सभा माजी प्रांतिक अध्यक्ष,माजी
प्रांतिक सदस्य काँग्रेस,सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ डी १ चे माजी प्रांतपाल,
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व विद्यामंदिर परिवार, लायन्स क्लब, महाराष्ट्र साहित्य परिषद,
नगर वाचन मंदिर सांगोला शाखांचे मार्गदर्शक मा. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या आचार-विचारांतील सेवाभाव प्रमाण मानून यावर्षीही त्यांच्या
७२ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे २३ वे वर्ष असून, दरवर्षी १००० पेक्षा जास्त रक्तदाते या मानवतेच्या कार्यात सहभागी होतात.
एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो.
सुट्यांचा काळ आणि वाढत्या अपघातांमुळे रक्ताची निकड भासत असताना, थॅलसेमिया, डायलिसिस आणि शस्त्रक्रिया असलेल्या
रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. हीच सामाजिक गरज ओळखून 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' या भावनेतून सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणी या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षीचे शिबिर बुधवार दि. २० मे २०२६ रोजी लोणविरे हायस्कूल लोणविरे, गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा,
तसेच शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी पांडुरंग कॉम्प्लेक्स आदर्श पतसंस्था शेजारी कोळा व जि. प. प्रा. मुलींची शाळा नं. १ जुने कोर्ट जवळ, सांगोला येथे सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत संपन्न होत आहे. तरी
सांगोला शहर व तालुक्यातील सर्व शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक व सेवाभावी संस्थांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहून रक्तदान करून मानवतेचे महान कार्य करावे, असे आवाहन विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला यांच्या वतीने करण्यात येत आहे.
*चौकट*- तुमच्या रक्ताचा एक थेंब, दुसऱ्याच्या जीवनाची उमेद ठरू शकतो; चला, मानवतेचे हे महादान करूया!
*रक्तदान शिबिर स्थळ व वेळ:* बुधवार दि. २० मे २०२६ लोणविरे हायस्कूल लोणविरे,गुरुवार दि. २१ मे नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा, शुक्रवार
दि. २२ मे पांडुरंग कॉम्प्लेक्स कोळा व जि. प. मुलींची शाळा नं. १ सांगोला. सर्व ठिकाणी वेळ सकाळी ८ ते सायं. ६ पर्यंत राहील.


0 Comments