Breaking News

जनगणना 2027 ला आजपासून प्रारंभ; नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे – डॉ. सुधीर गवळी

जनगणना 2027 ला आजपासून प्रारंभ; नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे – डॉ. सुधीर गवळी


सांगोला : भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनगणना 2027 या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार, दि. 16 मेपासून देशभरात करण्यात आला आहे.

 या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना प्रक्रिया सुरू करण्यात आली 

असून सांगोला शहरातील नागरिकांनी प्रगणकांना अचूक व सत्य माहिती देऊन सहकार्य करावे, 

असे आवाहन चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

या मोहिमेत प्रत्येक कुटुंबाची, घराची तसेच उपलब्ध सुविधांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. 

यासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक शासकीय ओळखपत्रासह नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत.

 नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची स्पष्ट व योग्य उत्तरे द्यावीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जनगणनेदरम्यान दिलेली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येणार असून तिचा वापर केवळ सांख्यिकीय उद्देशासाठीच केला जाणार आहे. 

यावेळी प्रगणकांकडून विचारण्यात येणाऱ्या 34 प्रश्नांची उत्तरे देणे नागरिकांसाठी बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला SE आयडी क्रमांक प्रगणकांना उपलब्ध करून द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

खोटी माहिती दिल्यास कारवाईची तरतूद

जनगणना प्रक्रियेदरम्यान चुकीची माहिती देणे किंवा माहिती देण्यास नकार देणे नागरिकांना महागात पडू शकते. जनगणना कायदा 1948 नुसार अचूक माहिती देणे

 हे प्रत्येक नागरिकाचे कायदेशीर कर्तव्य असून, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments