Breaking News

स्वत:च्या गावातच काम करा, १८,००० रु मानधन मिळवा, कृषीमंत्र्यांकडून नवीन योजनेची घोषणा, पात्रता काय? माहिती आली समोर

स्वत:च्या गावातच काम करा, १८,००० रु मानधन मिळवा,


कृषीमंत्र्यांकडून नवीन योजनेची घोषणा, पात्रता काय? माहिती आली समोर 

“गावागावात ‘कृषी मित्र’! तरुणांना रोजगाराची संधी; वर्षाला १८ हजार मानधन”

राज्यातील शेती अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी कृषी विभागाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांपर्यंत थेट तांत्रिक मार्गदर्शन पोहोचावे

 यासाठी प्रत्येक गावात ‘कृषी मित्र’ नियुक्त करण्याची योजना लवकरच सुरू होणार आहे. 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या योजनेमुळे गावातीलच तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच तज्ज्ञ सल्ला मिळणार आहे. 

कृषी मित्र हा स्थानिक पातळीवर काम करत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनांची माहिती देणार आहे.

राज्यात आधीच ११,५८७ कृषी पर्यवेक्षक कार्यरत आहेत. आता ‘आत्मा’ योजनेअंतर्गत प्रत्येक गावात किमान एक कृषी मित्र नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 हे कृषी मित्र संबंधित कृषी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून काम करतील, ज्यामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल.

या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना वर्षाला १८,००० रुपये मानधन देण्यात येणार 

असून ते दर तीन महिन्यांनी दिले जाईल. योजना १ जूनपासून सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

पात्रता आणि अटी:

वय ४० वर्षांपेक्षा कमी

किमान १०वी किंवा १२वी उत्तीर्ण

चांगले संवाद कौशल्य

समाजकार्याची आवड

सोशल मीडियाचा वापर करता येणे आवश्यक

महत्त्वाचे म्हणजे, या योजनेत महिलांना ३० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ११,५८७ कृषी मित्रांची भरती जिल्हास्तरावर केली जाणार आहे. 

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन मिळणार असून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments