Breaking News

सांगोल्यात पाणीटंचाईवर खासदारांचा धडाका; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

सांगोल्यात पाणीटंचाईवर खासदारांचा धडाका; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश


सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महत्त्वपूर्ण आढावा बैठक

 घेऊन प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. या बैठकीत तहसीलदारांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत टेंभू–म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणी वाटपाचे नियोजन, निरा उजवा कालव्याच्या पाण्याचा योग्य वापर, जलजीवन 

मिशनमधील रखडलेली कामे, तसेच दुष्काळग्रस्त गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा यावर सखोल चर्चा करण्यात आली.

याशिवाय तालुक्यातील विविध जलपुरवठा योजनांची सद्यस्थिती आणि विजेच्या अडचणींचाही आढावा घेण्यात आला. 

निर्माण झालेल्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक नेते, सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments