इंधन बचतीसाठी रेल्वेच पर्याय; मिरज–पंढरपूर–लातूर मार्गावर गाड्या वाढविण्याची मागणी
सांगोला | प्रतिनिधी देशातील वाढत्या इंधन खर्चासह परकीय चलनाची होणारी मोठी गळती रोखण्यासाठी रेल्वे सेवा वाढविणे अत्यावश्यक असल्याची भूमिका मांडत
सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे निवेदनाद्वारे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.
कोल्हापूर–मिरज–पंढरपूर–कुर्डूवाडी–लातूर या मार्गावर रेल्वे फेऱ्या वाढवून ग्रामीण व सीमाभागातील नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून द्यावी, असे संघटनेने नमूद केले आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार कोल्हापूर, मिरज, सांगली, कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला आणि पंढरपूर परिसरातून दररोज हजारो खासगी वाहने प्रवास करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा वापर होत
असून देशाचे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन खर्ची पडत आहे. रेल्वे सेवा वाढवल्यास इंधन बचतीसोबतच रस्ते अपघात, वाहतूक कोंडी आणि पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
याशिवाय रेल्वे नेटवर्क मजबूत झाल्यास ग्रामीण भागातील उद्योग, पर्यटन, व्यापार आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती पंतप्रधान Narendra Modi तसेच रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.
अधिक मास व आषाढी एकादशी यात्रेदरम्यान पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल होत असतात. त्यामुळे खासगी वाहनांवरील ताण कमी
करण्यासाठी मिरज–पंढरपूर–पुणे तसेच कोल्हापूर–कलबुर्गी मार्गावर दर चार तासांनी नियमित रेल्वे सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी संघटनेचे सरअध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी केली आहे.


0 Comments