Breaking News

कर्तव्य बजावत असतानाच शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू; सांगोला विद्यामंदिरावर शोककळा

कर्तव्य बजावत असतानाच शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू; सांगोला विद्यामंदिरावर शोककळा


सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली असून, सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक राजेंद्र ढोले सर यांचे 

आज सोमवार (दि. २५ मे २०२६) रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. विशेष म्हणजे, ते राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यूसमयी त्यांचे वय ४८ वर्षे होते. आपल्या शांत, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे ढोले सर विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षकांमध्येही अत्यंत लोकप्रिय होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले होते. 

त्यांच्या अकस्मात निधनाने सांगोला परिसरातील शैक्षणिक, सामाजिक व नागरिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. ढोले सर यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले.

त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता ढोले वस्ती, पुजारी मळा परिसर, सांगोला येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments